शनिवार, 8 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (08:22 IST)

राज्यात दीड हजार नवे रुग्ण, अडीच हजार रुग्णांना डिस्चार्ज

One and a half thousand new patients
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ओहोटी लागली असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. राज्यात बुधवारी  २ हजार ७९१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, १ हजार ६३८ रुग्णांची वाढ झाली आहे.
 
राज्यात आजपर्यंत एकूण ६४ लाख २४ हजार ५४७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४२ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात १ हजार ६३८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५ लाख ९४ हजार ८२० झाली आहे. तर  ४९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. सध्या राज्यात एकूण २६ हजार ८०५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
 
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,१२,४८,८२० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,९४,८२०(१०.७७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,०९,७९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.