राज्यात 2,078 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी
राज्यात कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली असून रुग्णांची संख्या दीड हजाराच्या आत आली आहे. दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील घडली आहे. मगील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या अडीच हजाराच्या आसपास स्थिरावली होती. राज्यात मंगळवारी 1 हजार 485 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 2 हजार 078 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आतापर्यंत 64 लाख 93 लाख 182 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.4 टक्के आहे.तसेच 27 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आजपर्यंत राज्यात 1 लाख 39 हजार 816 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.
सध्या राज्यात 28 हजार 008 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 11 लाख 16 हजार 353 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 93 हजार 182 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.राज्यात सध्या 2 लाख 08 हजार 613 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 961 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.