शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (08:22 IST)

बाप्परे, 3 कोटी 25 लाख रुपये किंमतीचा गांजा पकडला

बुलडाणा जिल्ह्यात वाशिमच्या रिसोड मार्गावर रिसोड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रिसोड मार्गावर गांजाची तस्कारी होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एक टेंपो पकडला. यात जनावारांच्या चारा घेऊन जाणाच्या नावाखाली या टेम्पोमधून चक्क गांजाची तस्करी केली जात होती.
 
पोलिसांनी या टेम्पोमधन तब्बल 11 क्विंटल 50 किलो गांजा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची बाजारात 3 कोटी 25 लाख रुपये किंमत आहे. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकासह तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. राज्यात बंदी असतानाही इतर राज्यातून गांजा आणून त्याची विक्री केली जात होती. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.