शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 28 जुलै 2021 (15:49 IST)

बाप्परे, डॉक्टर तीन वेळा कोरोनाच्या विळख्यात सापडली

मुंबईत एक डॉक्टर तीन वेळा कोरोनाच्या विळख्यात सापडली.आश्चर्यकारक बाब म्हणजे या डॉक्टराने लसीचे दोन्ही डोस घेतले होते.त्यानंतरही ही महिला डॉक्टर पॉझिटिव्ह आली.त्यानंतर डॉ.सृष्टी हलारी यांचा नमुना जीनोम सिक्वेंन्ससाठी गोळा केला गेला आहे, त्याचा अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर त्यांना तिनदा कसा कोरोना झाला याचा उलगडा होणार आहे.
 
एनडीटीव्हीच्या अहवालानुसार,डॉ. सृष्टी हलारी पहिल्यांदा जून 2020 मध्ये कोरोना विषाणूने संक्रमित झाल्या. यानंतर, एप्रिल 2021 पर्यंत त्यांनी कोरोना लसचे दोन्ही डोस घेतले होते.असे असूनही, 29 मे रोजी त्या पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. तथापि, यावेळी त्यांना कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणे दिसली आणि त्या घरीच क्वारंटाईन झाल्यात. आता त्या यातून बऱ्या झाल्या आहेत.
 
दोनदा संसर्ग झाल्यावरही कोरोना विषाणूने डॉ. सृष्टी यांचा पाठलाग सोडला नाही आणि 11 जुलै रोजी त्यांना तिसऱ्यांदा या साथीच्या विषाणूची लागण झाली.धक्कादायक बाब म्हणजे एप्रिलमध्येच संपूर्ण कुटुंबाचे कोरोना लसीकरण झाले होते, त्यानंतरही, विषाणूने त्यांना दोनदा घेरले. बीएमसीच्या वीर सावरकर हॉस्पिटलच्या कोविड वॉर्डात सृष्टी ड्यूटी करत असल्याच्या प्रकरणात सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. डॉक्टर हा कोरोनाचा नवीन स्ट्रेन आहे की नाही, हे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.