शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 28 जुलै 2021 (08:17 IST)

वन्य प्राण्यांना दत्तक घ्या; वन्य जीव संवर्धनास मदत करा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची योजना

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली येथील वन्य प्राणी आता दत्तक घेता येतील.सिंह वाघ बिबट,वाघाटी अशा अनेक बंदिस्त वन्य प्राण्यांची देखभाल इथे केली जाते उद्यानातील बंदिस्त वन्य प्राण्यांना दत्तक घेतल्यामुळे वने व वन्यजीव संवर्धनाच्या अनमोल कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी सर्वांना मिळणार आहे.वन्यजीव प्रेमी,संस्था आणि कंपनी यांनी प्राण्यांना १ वर्षाकरिता दत्तक घेऊन वन्यजीव व्यवस्थापनात सहभागी व्हावे असे आवाहन वनसंरक्षक व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक जी. मल्लिकार्जुन यांनी केले आहे. ही दत्तक रक्कम एका वर्षासाठी आहे
वाघ रुपये ३,१०,०००,
सिंह रुपये ३,००,०००,
बिबट्या रुपये १,२०,०००,
वाघाटी रुपये ५०,०००
नीलगाय रुपये ३०,०००,
चितळ रुपये २०,०००,
भेकर रुपये १०,०००,
अधिक माहिती आणि अर्ज करण्याकरीता इच्छुकांनी खालील कार्यालयाशी संपर्क साधावा. वन संरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व) मुंबई २.अधीक्षक, सिंह विहार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व) मुंबई.