शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 27 जुलै 2021 (22:34 IST)

रस्ते दुरुस्तीसाठी अनोखे आंदोलन, केला होम हवन

आतिष भोईर, कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या आशेळी गावातील मुख्य रस्त्याची गेल्या पाच वर्षापासून दुरावस्था आहे. या रस्त्याच्या डागडुजी संदर्भात सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला, मात्र अद्यापही रस्त्याची डागडुजी होत नसल्याचं भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी म्हटलं आहे. 
 
गेल्या पाच वर्षांपासून नागरिक खड्डेमय रस्त्यातून प्रवास करत आहेत याच्या निषेधार्थ आमदार गणपत गायकवाड यांनी  या खड्डेमय रस्ता तसेच मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून होम हवन करत उपरोधीक आंदोलन केलं. यावेळी आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे याचा भूमिकेचा निषेध नोंदवला.