मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified बुधवार, 27 जानेवारी 2021 (07:28 IST)

राज्यात २ हजार २०४ नवे कोरोना रुग्ण दाखल

राज्यातील करोना संसर्ग अद्याप सुरूच असून मंगळवारी  कोरोनाबाधित रूग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. मंगळवारी २ हजार २०४ नवे कोरोना रुग्ण दाखल झाले.  कोरोनामुळे राज्यात ४७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २० लाख १३ हजार ३५३ वर पोहोचली आहे.
 
राज्यात ४३ हजार ८११ सक्रिय रूग्ण आहेत. तर, आतापर्यंत ५० हजार ८६२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. दिवसभरात महाराष्ट्रात २ हजार १०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.२४ टक्के इतके झाले आहे. आतापर्यंत राज्यात १९ लाख १७ हजार ४५० जणांनी कोरोनावर मात केली आहे.
 
पुणे शहरात दिवसभरात २२५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ८५ हजार ००५ इतकी झाली आहे. दिवसभरात तिघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडादेखील ४ हजार ७४२ इतका झाला आहे. पुण्यात आतापर्यंत एकूण १ लाख ७८ हजार २७४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.