सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: औरंगाबाद , बुधवार, 29 एप्रिल 2020 (07:43 IST)

घाटी रुग्णालयातील 22 कर्मचारी क्वारंटाईन

कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील नर्स, निवासी डॉक्टरांसह 22 कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन कारण्यात आले आहे. या सर्व 22 कर्मचाऱ्यांचे स्वाब नमुने घेण्यात आले असून त्याचा अहवाल सायंकाळी प्राप्त होईल अशी माहिती डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

या घटनेनंतर घाटी रुग्णालयात भीतीचं वातावरण पसरलं आहे. प्रशासनाकडून या सर्वांना प्रोटेक्टिव्ह किट्स दिले जात असून मास्क साठाही मोठ्या प्रमाणात देण्यात येत असल्याचे येळीकर यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाच्या लढाईत रुग्णांचा वबचाव करणाऱ्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण होत असून चिंता व्यक्त केली जात आहे.