बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: नागपूर , सोमवार, 15 मार्च 2021 (12:15 IST)

नागपूर येथे धंतोली स्थित LIC स्टॉफ क्वाटर्समध्ये 23 कोरोनाबाधित आढळले

कोरोनाशी लढण्याकरिता नागपूर महानगरपालिका प्रशासन सगळ्या उपाययोजना करित आहे. परंतु कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.आता फक्त शासकीय कार्यालयातच नाही तर स्टाफ क्वाटर्समध्ये सुध्या कोरोना मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. 
 
धंतोली स्थित एलआयसी स्टॉफ क्वाटर्समध्ये 23 कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली. एकाच इमारतीत एवढे रुग्ण आढळल्याने संपूर्ण इमारतीला सील करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे इतर 50 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. माहितीनुसार 14 कोरोना बाधित रुग्णांना व्हीएनआयटी कोवीड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.