रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 13 मार्च 2021 (22:51 IST)

देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळणाऱ्या पहिल्या दहा शहरात नाशिक

नाशिक शहरातला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. यामध्ये होम आयसोलेशन मधील बाहेर फिरणारे सुपर स्प्रेडर असून त्यांच्यामुळे रुग्ण वाढण्याची भिती आहे. त्यामुळे त्यांना शोधुन जबरदस्ती पालिका रुग्णालयात दाखल करणार असून त्यांच्यावर गुन्हाही दाखल करणार असल्याची माहिती  नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. 
देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळणाऱ्या पहिल्या दहा शहरात नाशिकचा समावेश झाला. त्यामुळे परीस्थितीची गंभीरता ओळखून पालिका आयुक्तांनी तातडीने खाते प्रमुखांची बैठक घेतली. याबाबत अधिक माहिती देतांना आयुक्तांनी सांगतिले की, संसर्ग टाळण्यासाठी नाशिक शहरातील शाळा 31 मार्च पर्यंत बंद राहतील. दहावी आणि बारावीसाठी  मात्र पालकांच्या संमतीने वर्ग सुरू राहू शकतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाबाबत उपाययोजना करण्यासाठी आरोग्य पथकांची निर्मिती करण्यात आली असून तातडीने नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. दोन हेल्पलाईन नंबरही देण्यात येतील तसेच आरोग्य नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी आता पालिका कर्मचारी रस्त्यावर दिसतील असंही ते म्हणाले.