1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 13 मार्च 2021 (22:21 IST)

'या' घटनेमुळे मराठी व कन्नडीगांमध्ये नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता

व्हॉट्सअॅप स्टेटस मराठी भाषेत ठेवल्याने बेळगावमध्ये तीन मराठी मुलांना अटक करण्यात आली आहे. कर्नाटक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामुळे मराठी भाषिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. 
 
दरम्यान, दिगंबर डेळेकर, निखिल केसरकर आणि विशाल छप्रे अशी अटक करण्यात आलेल्या मुलांची नावं आहेत.गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणावाचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या रुग्णवाहिकेवर कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. रुग्णवाहीकेला काळे फासण्याचाही प्रयत्न केला. विशेष म्हणजे ही घटना जेव्हा घडली तेव्हा तेथे पोलिसही उपस्थित होते. मात्र पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कन्नड संघटनेच्या कार्यकर्तं्यायाना हुसकावून लावले. पण त्यानंतर हा वाद अधिकच चिघळला.