मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शनिवार, 13 मार्च 2021 (18:43 IST)

अकबर बिरबल कहाणी -कावळे किती?

akbar birbal katha
बिरबलाच्या चातुर्याला बादशहा अकबर आणि सर्व दरबारी जाणून होते. तरीही अधून मधून  बादशहा अकबर हे बिरबलाची परीक्षा घेत असायचे.  
एकदा सकाळी बादशहा अकबराने बिरबल ला बोलविले आणि बागेत यायला सांगितले. बागेत अनेक प्राणी होते. तेवढ्यात अकबराची दृष्टी एका कावळ्यावर पडली आणि त्यांच्या मनात बिरबलाची परीक्षा घेण्याचा विचार आला. त्यांनी बिरबलाला विचारले " मला हे जाणून घ्यायचे आहे की आपल्या राज्यात एकूण कावळे किती आहेत? '' प्रश्न जरा विचित्र होता. तरी ही बिरबलाने उत्तर दिले '' बादशहा मी आपल्या या प्रश्नाचे उत्तर सहज देऊ शकतो. परंतु मला थोडा वेळ द्या. " अकबराने मनातल्या मनात हसत बिरबलाला मुदत दिली.    
 
काही दिवसां नंतर बिरबल दरबारात आले. त्यांना बादशहा ने विचारले की "सांगा बिरबल आपल्या राज्यात एकूण किती कावळे आहेत? बिरबल म्हणाले " बादशहा हुजूर आपल्या राज्यात एकूण 323 कावळे आहेत. " हे ऐकून सर्व दरबारी बिरबलाला बघू लागले.  
 
यावर बादशहा म्हणाले "की राज्यात या पेक्षा जास्त असले तर? " तर ते पाहुणे म्हणून आपल्या राज्यात आले असतील. "
बादशहा म्हणाले "की आणि या पेक्षा कमी असतील तर? " तर आपल्या कडील कावळे बाहेरच्या राज्यात पाहुणे म्हणून गेले असतील. "  
बिरबलाने असे म्हटल्यावर संपूर्ण दरबारात गोंधळच झाला. बिरबलाच्या या उत्तर साठी बादशहा अकबर ने त्याचे खूप कौतुक केले.  
 
शिकवण- नेहमी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून प्रत्येक समस्येचे समाधान मिळवता येते. योग्य ठिकाणी मेंदूचा वापर केल्यास कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळवता येते.