1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. स्वतःला घडवताना
Written By
Last Modified: शनिवार, 13 मार्च 2021 (18:21 IST)

कमी वेळात योग्य निर्णय कसा घ्यावा

प्रत्येकाची निर्णय घेण्याची क्षमता वेगळी असते. आपल्याला दररोज बरीच कामे करावी लागतात. यासाठी आपल्याला अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतात. जर आपला निर्णय योग्य असेल तर तो प्रभावी होतो आणि त्याचे फायदे मिळतात, जर निर्णय चुकीचा असेल तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. आपल्या कडे वेळ कमी असेल आणि आपल्याला त्वरित निर्णय घ्यायचे असतील तर आपण गोंधळून जातो. आणि निर्णय चुकीचा घेऊन बसतो. असं होऊ नये. या साठी कमी वेळात योग्य निर्णय घेण्याची क्षमता कशी वाढवता येईल हे सांगत आहोत. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 निर्णय घेण्यात फायदा आणि तोटा बघावा-
कोणते ही निर्णय घेण्यापूर्वी त्याचे फायदे आणि तोटे बघून निर्णय घ्यावा. जेणे करून आपण योग्य निर्णय घेऊ शकाल. 
 
2 योग्य योजना आखावी- 
कोणतेही निर्णय घेण्यासाठी योग्य योजना आखावी लागते. जर आपण योग्य कार्याची योजना आखणार नाही तर योग्य निर्णय घेतल्यावर देखील आपण अपयशी व्हाल. आणि आपण चुकीचा निर्णय घेऊ बसलो आहोत असे वाटेल.म्हणून कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी योग्य योजना आखा. 
 
3 निर्णय घेताना भावनांना  दुर्लक्षित करा-
कोणतेही निर्णय घेताना भावनांना दुर्लक्षित करा. जर आपण भावनामध्यें आला तर कोणतेही निर्णय घेऊ शकणार नाही. भावनांत येऊन कोणतेही निर्णय घेऊ नका.  
 
4 कोणत्याही दबावात येऊन  निर्णय घेऊ नका- 
कोणतेही निर्णय घेताना कोणत्याही प्रकारचा दबाब आणू नये. निर्णय घेताना आपली आवड त्यामध्ये असावी. अन्यथा आपण त्या निर्णयावर कोणतेही काम करू शकणार नाही. आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाऊ शकतो. आवडीनुसार निर्णय घेतले तर काम करायला चांगले वाटेल आणि आळस देखील येणार नाही. 
 
5 वेळेचे लक्ष ठेवा- 
कोणताही निर्णय घेताना वेळेला महत्त्व द्या,घाईघाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. एखादे मोठे निर्णय घ्यायचे असेल तर त्याला योग्य आणि पुरेसा वेळ द्या.लहान निर्णय घ्यावयाचा असेल तर कमी वेळ दिला तरी चालेल.   
अशा प्रकारे आपण आपली निर्णय क्षमता वाढवू शकाल.