बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Updated : शनिवार, 13 मार्च 2021 (18:32 IST)

LIC एजंट कसे बनायचे जाणून घ्या

एलआयसी ऑफ इंडिया (लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) विमा कंपनी आपल्या एजंटला लोकांपर्यंत आपला व्यवसाय वाढविण्यासाठी विमा योजना पोहोचविण्यास मदत करते , हे एजंट कंपनी आणि ग्राहक यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करतात आपण अर्धवेळ किंवा पूर्ण वेळ काम करू शकता. आपली एजंट म्हणून काम करायची इच्छा असल्यास, एलआयसीमध्ये एजंट म्हणून काम करून आपले उत्पन्न वाढवू शकता. आपण एलआयसी एजेंट कसे बनू शकता हे जाणून घेऊ या. 
 
भारतीय आयुर्विमा महामंडळ गेले  अनेक वर्षे लोकांची सेवा करत आहे. ही संस्था विश्वसनीय आहे. आपण या संस्थेत पूर्ण किंवा अर्धा वेळ सहभागी होऊ शकतात. एलआयसी एजंट होण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन अर्ज करावा लागेल, या साठी अर्जदाराने जवळच्या एलआयसीच्या शाखा कार्यालयात संपर्क साधावा . आणि तिथल्या विकास अधिकाऱ्याला भेटावे .  
आपण पात्र असाल तर आपल्याला परीक्षण देण्यात येईल. या मध्ये विमा व्यवसायाची संपूर्ण माहिती अर्जदाराला पुरविली जाते.प्रशिक्षण झाल्यावर चाचणी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. नंतर एजंट म्हणून नेमणूक केली जाते. 
 
एजंट होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे- 
* पासपोर्ट आकाराचे सहा फोटो.
* दहावी आणि बारावीच्या प्रमाण पत्राची छायाप्रत .
* पॅनकार्ड.
* रहिवासी प्रमाण पत्र, मतदार ओळखपत्र , आधारकार्ड.  
 
एलआयसी एजंट होण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा- 
या साठी अर्जदाराने एलआयसी च्या संकेत स्थळावर https://agencycareer.licindia.in/agt_req/ जाऊन भेट द्यावी आणि ऑनलाईन नोंदणी करावी. या नंतर एलआयसी कडून मेल किंवा ईमेल येत, या मध्ये आपल्याला पुढील प्रक्रिया आणि नियमांना सांगितले जाते.अधिक माहिती साठी आपल्याला नजीकच्या एलआयसी कार्यालयात जाऊन संपर्क करून माहिती मिळवावी लागेल.