मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 4 मार्च 2020 (15:08 IST)

भारतात कोरोना व्हायरसची 28 जणांना लागण

कोरोना व्हायसरने भारतात प्रवेश केला असून देशभरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता थेट 28 च्या घरात पोहोचला आहे.  भारतात करोनाचे एकूण २८ रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. 
 
याबद्दल सविस्तर माहिती देत हर्षवर्धन यां‍नी सांगितले की राजधानीत रुग्णांची संख्या वाढली तर हॉस्पिटलमध्ये चांगल्या दर्जाचे स्वतंत्र वॉर्ड स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. 
 
आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि कोरोनाचा सामना करण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेतला. सध्या कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी 15 प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. आणखी 19 प्रयोगशाळांची निर्मिती सरकारकडून केली जाणार आहे, अशी माहिती डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे. 
 
दिल्लीतील पीडित जवळपास 66 लोकांच्या संपर्कात आला होता. आग्रा येथे राहणाऱ्या त्याच्या कुटुंबातील सहा जणांना करोनाची लागण झाली असल्याची निष्पन्न झालं आहे. तसंच तेलंगणामधील प्रकरणीत पीडित 88 लोकांच्या संपर्कात आला होता. दरम्यान देशभरात एकूण 28 जणांना करोनाची लागण झाली असून यामधील तिघांवर उपचार करण्यात आले असून त्यांच्यात सुधारणा झाली असल्याचं यावेळी हर्षवर्धन यांनी सांगितलं.
 
WHO ने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे मृत पावलेल्यांचा आकडा तब्बल तीन हजारावर पोहोचला आहे.