सोमवार, 7 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By

कोरोना जनजागृतीसाठी मोदींचा पुढाकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आवाहन करत करोना व्हायरसच्या भीतीने घाबरून जाण्याचे कारण नाही असे स्पष्ट केले. करोना व्हायरसवर प्रतिबंध करण्यासाठी आपण एकत्रपणे लढण्याची गरज असल्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलेल्या माहितीमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या टीप्स शेअर करण्यात आल्या आहेत. या टीप्स छोट्या असल्या तरीही स्वयंसुरक्षेसाठी महत्वपुर्ण आहेत असे ट्विट त्यांनी केले आहे.
 
प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या टीप्स  
 
 – तुमचे हात नियमितपणे स्वच्छ करा
 
– गर्दीची ठिकाणे टाळा
 
– तुमचे डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा
– शिंकताना तसेच खोकताना तुमचे तोंड पुर्णपणे झाका, तसेच टिश्यूचा वापर करा
– तुमच्या आरोग्य सल्लागाराकडून वेळोवेळी या व्हायरसची माहिती घेत रहा
– मदतीसाठी +91-11-23978046
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की केंद्र सरकारमार्फत विविध राज्यांमधील आरोग्य मंत्रालये तसेच राज्य सरकार हे चर्चा करत आहे. विविध मंत्रालये आणि राज्य सरकार एकत्रितपणे करोना व्हायरससाठी स्क्रिनिंगचे काम करत आहेत. तसेच लोकांना योग्य असे वैद्यकीय उपचार देत आहेत असेही त्यांनी ट्विटमध्ये त्यांनी नमुद केले आहे.