मंगळवार, 12 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जानेवारी 2020 (14:24 IST)

राहुल गांधींचे वादग्रस्त विधान- नथुराम गोडसे आणि पंतप्रधान मोदींची विचारधारा समान आहे

कल्पेट्टा काँग्रेस (Congress)चे नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मोठा हल्ला चढविला आहे. काँग्रेसच्या 'संविधान वाचवा' मोर्चाच्या वेळी झालेल्या मोर्च्यात राहुल म्हणाले, 'नथुराम गोडसे आणि नरेंद्र मोदी एकाच विचारसरणीवर विश्वास ठेवतात, त्यांच्यात काही फरक नाही. नरेंद्र मोदी यांना गोडसेवर विश्वास असल्याचे सांगण्याची हिंमत नाही.
 
राहुल म्हणाले, 'तुमच्या लक्षात आले असेलच की जेव्हा तुम्ही नरेंद्र मोदींना बेरोजगारी आणि नोकरीबद्दल विचारता तेव्हा ते अचानक लक्ष विचलित करतात. NRC  आणि CAAला रोजगार मिळणार नाही, काश्मिराची परिस्थिती आणि आसाम जाळणे आमच्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत नाही.' 
 
ते म्हणाले, 'भारतीयांना ते भारतीय आहेत हे सिद्ध करण्यास सांगितले जाते. मी भारतीय आहे हे ठरवण्यासाठी नरेंद्र मोदी कोण आहेत? कोण भारतीय आहे आणि कोण नाही हे ठरविण्यासाठी परवाना कोणाला दिला आहे? मला माहीत आहे की मी एक भारतीय आहे आणि मला ते सिद्ध करण्याची गरज नाही.