मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मोदी सोशल मिडीया सोडणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवार पासून फेसबुक,ट्विटर ,इस्टाग्राम आणि यू ट्यूब असे सर्व अकाउंट सोडू इच्छितो अशा प्रकारचं एक आश्चर्यकारक ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडियाला रामराम करण्याच्या विचाराने ट्वीटरवर #NoSir हॅशटॅग ट्रेन्ड होत आहे. “सोशल मीडिया सोडावं असा मी विचार करत आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर म्हणाले आहेत. त्यांच्या या ट्विटनंतर देशभरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मोदी का सोशल मीडिया सोडत आहेत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यामागे सर्वात महत्त्वाचं कारण हे दिल्ली हिंसाचार असल्याची शक्यता आहे (PM Modi Giving up social media).
 
दिल्लीत गेल्या आठवड्यात मोठा हिंसाचार घडला. या हिंसाचारात जवळपास 40 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. या घटनेचं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संपूर्ण देशातील नागरिकांना दु:ख झालं आहे. या घटनेनंतरही सोशल मीडियावर अनेक चुकीच्या आणि खोट्या बातम्या, अफवा पसरविल्या जात असल्याचं समोर आलं आहे.
 
सोशल मीडियातून चुकीची माहिती पसरवल्यामुळे याअगोदर मॉब लिचिंगसारख्याही घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. त्यानंतर आता दिल्ली हिंसाचारासारखी घटना घडली आहे. या घटनेमुळे नाराज होऊन पंतप्रधान मोदी सोशल मीडिया सोडण्याचा विचार करत आहेत (PM Modi Giving up social media), अशी माहिती मिळत आहे.
 
दरम्यान, सोशल मीडियावर खोटी माहिती किंवा अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई होणार आहे. तशाप्रकारचा कायदा आता सरकार बनवत आहे. केंद्र सरकारने त्यासाठी दिल्लीत नव्या समितीची स्थापना केली आहे. कॅबिनेट मंत्री सौरभ भारद्वाज हे या समितीचे अध्यक्ष आहेत. ही समिती सोशल मीडियावर वादग्रस्त, चिथावणीखोर किंवा खोटी माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करणार आहे. या कारवाईमार्फत आरोपीला 3 वर्ष जेलची शिक्षा होणार आहे.