शनिवार, 13 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

‘बस-टँकर-क्रुझर’च्या भीषण अपघातात, 9 जणांचा मृत्यू, 24 जखमी

महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील असलेल्या सोनगड शहराजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. बस-टँकर आणि क्रुझरच्या अपघातात 9 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 24 प्रवाशी जखमी झाले आहे. हा अपघात आज (सोमवार) पोखरण गावाजवळ झाला आहे.नागपूर सुरत महामार्गावरील गुजरात राज्याच्या हद्दीत सोनगड नजीक टँकर चुकीच्या साईडने आल्याने कुशलगठ-सुरत-उकई बसची धडक झाली. या दरम्यान मागून भरधाव वेगात येणारी प्रवाशी क्रुझरने बसला मागून जोरदार धडक दिली.

बस आणि टँकरच्या धडकेत बस एका बाजूने अर्ध्यापर्यंत कापली गेल्याने घटानास्थळी सात प्रवाशांचा मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.अपघातामुळे नागपूर सुरत महामार्गवर वाहतूक कोंडी झाली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.