शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रत्नागिरी , सोमवार, 2 मार्च 2020 (14:18 IST)

'नाणार' होणार नाहीच; शिवसेनेचा ठाम विरोध

राज्यात सत्तेत आल्यानंतर शिवसेनेने नाणार प्रकल्पावरून मवाळ भूमिका घेतल्याचे चित्र निर्माण झालेले असतानाच अखेर शिवसेनेने नाणारबाबतची भूमिका जाहीर केली आहे. कोकणात कोणत्याही परिस्थितीत नाणार प्रकल्प होणार नाहीच. हा प्रकल्प कधीच गाडला गेला असून नाणारला आमचा ठाम विरोध आहे, अशी गर्जनाच शिवसेनेने केली आहे. त्यामुळे नाणार प्रकल्प कायमचा रद्द होण्याची चिन्हे दिसत आहेत. 
 
सागवे कात्रादेवीवाडी कोचाळी मैदानावर नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी एका मेळाव्याचे  आोजन करण्यात आले होते. सभेला शिवसेना खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी, प्रकल्प विरोधी नेते अशोक वालम आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्याला हजारो लोक उपस्थित होते. राज्यात महाआघाडीची सत्ता आल्यानंतर शिवसेनेच्या हातात सत्तेचा रिमोट कंट्रोल आल्याने नाणारवरून शिवसेनेची भूमिका मवाळ झाल्याचे चित्रे निर्माण झाले होते. त्यामुळे या सभेत शिवसेना काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
 
ठाकरे यांनी नाणार प्रकल्प पूर्णपणे रद्द केल्याची घोषणा यापूर्वीच केलेली आहे.