शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020 (08:36 IST)

आज दिल्लीत बंधूभेट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोदी-सोनिया गांधींची घेणार भेट

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज राजधानी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी १२ वाजता पंतप्रधान मोदींना भेटतील तर सायंकाळी ६ वाजता सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.
 
महाविकास आघाडी सरकारला आता तीन महिने होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री दिल्लीत जाणार आहेत. या भेटीत ते आणखी काही मंडळींचीही भेट घेण्याची शक्यता आहे.