बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (09:43 IST)

'म्हणून' फडणवीस यांनी मुख्यमंत्री यांचे आभार मानले

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. शरद पवार यांच्या दबावाला बळी न पडता त्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. नवी मुंबईत भाजपाच्या राज्य परिषदेत ते बोलत होते.
 
फडणवीस म्हणाले, “मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे एका कारणासाठी आभार मानायचे आहेत की, त्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास पथकाकडे (एनआयए) वर्ग केला. शरद पवारांचा याला विरोध होता कारण, एनआयएनं तपास केल्यास खरं बाहेर पडेल याची त्यांनी भीती होती.”
 
दरम्यान, त्यांनी शिवसेनेवर विविध कारणांसाठी हल्लाबोल चढवला. फडणवीस म्हणाले, “माझं तुम्हाला आव्हान आहे की, जर तुमच्यामध्ये मोठा आत्मविश्वास असेल तर तुम्ही पुन्हा निवडणूक लढवा. या निवडणुकीत भाजपा एकटी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला हारवेल”.