सरकारकडून देशात दोन कोरोनाग्रस्त रुग्ण पॉझिटीव्ह असलेल्याचे स्पष्ट
नवी दिल्ली आणि तेलंगणा राज्यात हे कोरोनाग्रस्त रुग्ण असल्याची माहिती भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. यापूर्वी कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयावरून इतरांपासून पूर्ण वेगळे ठेवून उपचार करण्यात येत असलेल्या एका रुग्णाचा अर्नाकुलम वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात शुक्रवारी रात्री मृत्यू झाला.
केरळमधील या रुग्णाला खरंच कोरोनाची लागण झाल्याचे अद्याप सिद्ध झाले नाही. पण, तसे सिद्ध झाले, तर जगभर धुमाकूळ घालणाऱ्या या विषाणूने घेतलेला भारतातील तो पहिला बळी ठरेल. आता, सरकारकडून देशात दोन कोरोनाग्रस्त रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी एक रुग्ण दिल्लीत तर दुसरा रुग्ण तेलंगणात आढळून आला आहे. दिल्ली येथे पॉझिटीव्ह आढळेला रुग्ण हा इटलीतून भारतात आलेला आहे. तर, तेलंगणातील रुग्ण हा दुबईतून आला आहे. सध्या या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थीर असून त्यांना डॉक्टरांच्या निगरानीत ठेवण्यात आले आहे. तसेच, त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत.