1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 23 डिसेंबर 2020 (10:57 IST)

राज्यात ३ हजार १०६ नवे कोरोना रुग्ण आढळले

3 thousand 106 new corona patients
राज्यात मंगळवारी ४ हजार १२२ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे आत्तापर्यंत एकूण १७ लाख ९४ हजार ८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९४. ३ टक्के इतका झाला आहे. राज्यात ३ हजार १०६ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात ७५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के इतका आहे.महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. 
 
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २२ लाख १२ हजार ३८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख २ हजार ४५८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ९४ हजार ८१५ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३ हजार ६६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात ५८ हजार ३७६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
 
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९ लाख २ हजार ४५८ इतकी झाली आहे. नोंद झालेल्या ७५ मृत्यूंपैकी ४२ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर १६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीपूर्वीचे आहेत. हे १७ मृत्यू औरंगाबाद-४, गोंदिया-३, सांगली-३, नागपूर-२, पुणे-२, सोलापूर-१, वर्धा-१ आणि नाशिक-१ असे आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.