गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 22 डिसेंबर 2020 (08:49 IST)

राज्यात सोमवारी नव्या २८३४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

2834 new coronavirus
राज्यात सोमवारी नव्या २८३४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ५९४६९ झाली आहे. तसेच ६०५३ जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे. 
 
राज्यात आतापर्यंत ४८ हजार ८०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण १७,८९,९५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनाचा रिकव्हरी रेट ९४.२६ टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे महाराष्ट्र कोरोनामुक्तीच्या दिशेने वेगाने वाटचाल करू लागल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. मात्र नागरिकांनी सावधगिरी बाळगणे खूप आवश्यक असणार आहे.