मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 डिसेंबर 2020 (09:12 IST)

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी आपल्या आहारात या 5 गोष्टींना समाविष्ट करू नये

आजच्या काळात तरुण असो किंवा वृद्ध असो उच्च रक्तदाबाच्या आजाराने ग्रस्त आहे. जर आपण देखील या आजाराला नियंत्रणात ठेवण्यासाठी घेणाऱ्या औषधांना कंटाळला असाल तर आपल्या आहारात थोडस लक्ष द्यावे. चला तर मग जाणून घेऊ या 5 अश्या गोष्टींविषयी ज्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रूग्णांचे त्रास वाढू शकतात. त्यासाठी या गोष्टींना उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी आपल्या आहारात समावेश करू नये.
 
1 मीठ - 
उच्च रक्तदाब च्या रुग्णांसाठी मीठाचे अधिक सेवन उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाला कारणीभूत असू शकत.हे रक्त द्रव संतुलन वर परिणाम करत, ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते. हेच कारण आहे की उच्च रक्तदाब चे रुग्णांना आहारात कमी मीठ घ्यायला सांगतात.
 
2 लोणचं -
अन्नाला साठविण्यासाठी मीठाची आवश्यकता असते.मीठ अन्नाला त्वरित खराब होण्यापासून किंवा सडण्यापासून प्रतिबंधित करत आणि बऱ्याच काळासाठी खाण्याच्या योग्य ठेवत. भाज्या, कॅनिंग आणि द्रव पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी मीठ फार महत्त्वाचे आहे. पण मीठाने संरक्षित केलेल्या पदार्थांचे सेवन केल्यानं उच्च रक्तदाबच्या रुग्णांसाठी त्रासाचे कारण होऊ शकतात.
 
3 कॉफी-
उच्च रक्तदाब च्या रुग्णांनी चहा किंवा कॉफीचे सेवन कमी करावं. या पेयांमध्ये कॅफिन ची मात्र जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांचे त्रास वाढू शकतात.
 
4 डबाबंद सूप -
डबाबंद सूप मध्ये सोडियम चे प्रमाण जास्त असतात. डबाबंद आणि पॅक असलेल्या स्टॉक मध्ये सोडियम जास्त प्रमाणात असल्यामुळे ते आपल्या रक्तदाबाला वाढवतात. टोमॅटो सूपचा एक डबा किंवा कॅन सोडियमचा स्रोत असू शकतो.
 
5 चमचमीत मसालेयुक्त अन्न-
तसे तर, जास्त चमचमीत तिखट अन्नाचे सेवन करणे कोणासाठी चांगले नसते. पण उच्च रक्तदाबाच्या रुग्णाला असे अन्न खाणे टाळावे. मसाले युक्त चमचमीत अन्न खाल्ल्याने त्यांचे त्रास आणि रक्तदाब दोन्ही वाढू शकतात.