शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 15 डिसेंबर 2020 (08:57 IST)

पोटावरची चरबी कमी करते Lemon Tea

हिवाळ्यात चहा पिण्याचे बरेच फायदे आहेत पण हर्बल आणि सामान्य चहाच्या पानाव्यतिरिक्त लिंबाचा चहा किंवा लेमन टी देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लिंबात काही असे नैसर्गिक घटक असतात, जे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असतात. या सह हे आपल्याला खूप ताजेतवानं ठेवते. चला जाणून घेऊ या लेमन टी पिण्याचे फायदे.
 
* लिंबात सायट्रिक ऍसिड आढळतं. जे आपल्या पचन क्रियेला सुरळीत करत. दररोज सकाळी हे प्यावं. 
* लेमन टी मध्ये फ्लेवोनॉइड्स नावाचे रसायन आढळते. या मुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होत नाही आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येणाच्या धोका कमी संभवतो. 
* लेमन टी शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवते.
* लेमन टी प्यायल्याने सर्दी आणि फ्लू सारख्या समस्या उद्भवत नाही.
* या मध्ये बऱ्याच प्रमाणात अँटीऑक्सीडेंट चे गुणधर्म आढळतात. या सह यामध्ये पॉलिफिनॉल आणि व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात आढळत. जे शरीरात कर्करोगाच्या पेशींना तयार होण्यापासून रोखतो.
 
लेमन टी रेसिपी -
साहित्य 
1 चमचा किंवा 15 मिली लिंबाचा रस, 
2 चमचे किंवा 30 मिली मध, 
1 कप किंवा 240 मिली गरम पाणी,
1 काळ्या चहाची पिशवी (black tea bag)
सजवण्यासाठी लिंबाचा तुकडा (पर्यायी)
 
कृती -
गरम पाण्यात मध आणि लिंबाचा रस मिसळा : 2 चमचे मध आणि 1 चमचा लिंबाचा रस मिसळा. जर आपण ताजे लिंबं वापरात आहात तर आपल्याला अर्ध्या लिंबापासून 1 चमचा किंवा 15 मिली रस मिळेल. जर आपल्याकडे ताजे लिंबं नाही तर तीच चव मिळविण्यासाठी बाटलीबंद लिंबाचा रस वापरा. लक्षात असू द्या की आपल्याला या मिश्रणाला तो पर्यंत ढवळायचे आहे, जो पर्यंत आपल्याला कपाच्या तळाशी असलेले मध विरघळणार नाही.

टीप : जर आपण कपामध्ये गरम पाणी घालण्यापूर्वीच मध घातले, तर हे मध वेगाने विरघळेल.