शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: बुधवार, 9 डिसेंबर 2020 (09:46 IST)

काय सांगता, कढीपत्ताची पाने वजन कमी करतात

बरेच लोक असे असतात ज्यांना आपल्या अन्नात कढी पत्त्याच्या फोडणी शिवाय अन्नाची चवच आवडत नाही. जसं की सांबार, वरण, पोहे. जे कढीपत्त्याच्या फोडणी शिवाय अपूर्ण आहे. कढी पत्ता हे आपल्या अन्नाची चवच वाढवत नाही तर आरोग्यास देखील फायदेशीर आहे. हे आपल्या आहारात समाविष्ट करण्या व्यतिरिक्त आपण कढी पत्त्याचा रस देखील बनवू शकता, आणि आपले वजन कमी करू शकता. तसेच कढी पत्याच्या रस नियमितपणे प्यायल्यानं आरोग्यास अनेक फायदे मिळतात.
 
कढी पत्त्याचा रस कसा बनवायचा कृती जाणून घेऊ या
सर्वप्रथम 5 ते 10 कढी पत्त्याची पाने चांगल्या प्रकारे स्वच्छ करून धुऊन घ्या. आता एक ग्लास पाणी घ्या. या पाण्यात कढी पत्ता घालून ह्याला मिक्सरमध्ये वाटून घ्या. गाळून याचे सेवन करावे. हा हिरवा रस आपल्या वजनाला कमी करून आपल्या शरीरात असलेल्या विषारी पदार्थ टॉक्सिन बाहेर काढण्याचे काम करत.  

कढी पत्त्याच्या पानांच्या रसाचे फायदे
* सकाळच्या वेळी हा हिरवा रस प्यायल्याने आपल्या शरीराला महत्त्वाचे जीवन सत्त्व मिळतात जे आपल्या शरीराला सक्रिय बनविण्यासाठी महत्त्वाचे असतात. ह्याचा नियमितपणे सेवन केल्यानं पोटाची चरबी कमी करता येऊ शकते.
* या रसाचे सेवन केल्यानं पचन तंत्र चांगले राहते, तसेच पोटाचा त्रास देखील नाहीसा होतो.
* आपले वजन सतत वाढत असेल तर, कढी पत्त्याच्या पानांचा रस आपल्या वजनाला नियंत्रित करण्याचे काम करतो.  
* शरीराची प्रतिकारक क्षमता वाढविण्यात देखील हे मदत करत.
* शरीरात असलेल्या टॉक्सिन बाहेर काढण्यात कढी पत्त्याच्या पानांचा रस खूप उपयुक्त आहे.
* आपण या रसाला आणखी आरोग्यदायी बनविण्यासाठी या मध्ये पालक, ओवा, कोथिंबीर किंवा पुदिना देखील मिसळू शकता.