सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Updated : मंगळवार, 25 एप्रिल 2023 (20:33 IST)

घरच्या घरी बनवा Immunity Booster Juice, जाणून घ्या रेसिपी

आजारापासून स्वतःला लांब ठेवण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती बळकट ठेवणे खूप महत्त्वाचे आहेत. रोग प्रतिकारक शक्ती बळकट करण्यासाठी व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेले पदार्थ किंवा पेय घेण्याचा सल्ला दिला जात आहे. तर आपण घरच्या घरी असलेले ताजे फळ किंवा भाज्यांपासून रोग प्रतिकारक बूस्टर रस बनवू शकता. 
 
आपल्या स्वयंपाकघरात अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या सहजपणे उपलब्ध असतात. ज्यांना वापरून आपण आपली रोग प्रतिकारकशक्ती वाढवू शकता. 
 
जर आपली दिनचर्या खूप व्यस्त असेल आणि आपल्याला स्वतःसाठी  देखील काही वेगळे करू शकण्यास शक्य नसेल. तर आम्ही आज आपल्याला ज्या ज्यूस बद्दल सांगत आहोत, ते बनवायला अतिशय सोपे आहे आणि हे रोगांपासून मुक्त ठेवण्यास मदत करते. 
 
चला तर मग जाणून घेऊ या की आपली प्रतिकारक शक्ती बळकट करण्यासाठी कमी वेळेत कोणते ज्यूस तयार केले जाऊ शकते.
 
टोमॅटो ज्यूस - हे आपल्या आरोग्यास फायदेशीर असतं. हे एका अँटी ऑक्सीडेन्ट म्हणून काम करतं. अँटी ऑक्सीडेन्ट म्हणून काम करण्यासह हे प्रतिकारक शक्तीला बळकट करण्यासाठी सक्रिय रूपाने काम करतं. हे ज्यूस आपण घरी देखील बनवू शकता आणि ते देखील खूप कमी वेळात. कसे बनवता येते जाणून घेऊ या. 
 
* ज्यूस बनविण्यासाठी आपल्याला पाहिजे -
1 कप पाणी, चिमूटभर मीठ, 2 टोमॅटो.
 
ज्यूस कसा तयार करावा -
* सर्वप्रथम टोमॅटो पाण्याने स्वच्छ धुवावे.
* टोमॅटो बारीक बारीक चिरून मिक्सरच्या ज्यूसरच्या भांड्यात टाकावे.
* आता या ज्यूस जार मध्ये पाणी घालून 4-5 मिनिटे चालवावे ज्यामुळे ज्यूस चांगल्या प्रकारे तयार होईल.
* या नंतर हे एका ग्लास मध्ये काढून घ्यावं आणि वरून काळे मीठ घालावे आणि प्यावं.