शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (11:58 IST)

पाठ दुखत असेल तर...

सतत बसून राहणे, अयोग्य शारीरिक स्थिती, चुकीच्या पद्धतीने झोपणे अशामुळे पाठदुखी उद्‌भवू शकते. चुकीची जीवनशैली, आहाराकडे दुर्लक्ष, पोषक घटकांच्याकमतरतेमुळे पाठदुखी वाढते. पाठदुखीमुळे हालचालींवर मर्यादा येतात. म्हणूनच याची कारणे शोधून या समस्येला आळा घालण गरजेचे आहे. आहारात काही बदल करून ही समस्या दूर करू शकता.
 
कॅल्शियममुळे हाडे बळकट होत असली तरी ते कार्यरत राहण्यासाठी इतर घटकांची गरज असते. डी 3 जीवनसत्त्व. पालेभाज्या, सुकामेवा, दुग्धजन्य पदार्थांमधून कॅल्शियम मिळत असले तरी सूर्यप्रकाश हा डी जीवनसत्त्वाचा प्रमुख स्रोत आहे. या जीवनसत्त्वाची कमतरता भरून काढण्यासाठी पूरक औषधांची गरज लागते.
 
अतिरिक्त आम्लपित्तामुळे हाडे कमकुवत होतात. त्याच्या नियंत्रणासाठी लिंबूपाणी, कच्च्या बटाट्याचा रस, कोकम सरबत यांचे सेवन करायला हवे. हाडांमध्ये कॅल्शियम शोषले जाण्यासाठी के जीवनसत्त्वाची गरज लागते. तर मॅग्रेशियमही महत्त्वाचे आहे.