शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (13:26 IST)

Winter Food वजन कमी करण्यासाठी आहारात सामील करा

1 गाजर - प्रिबायोटिक गुणधर्म युक्त गाजराच्या सेवनानं वजन कमी केले जाऊ शकतं.
 
2 बीट - हिवाळ्यात मूळ असलेल्या ताज्या भाजीला आपल्या आहारात समाविष्ट आवर्जून करावे.
 
3 मुळा आणि शलगम - या भाज्या पोषक घटकाने समृद्ध असतात, हे रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासह पचन संस्थेला देखील सुधारते.
 
4 कांदा - वजन कमी करण्यासाठी कांदा रामबाण आहे, या मधील आढळणारे पोषक घटक चरबीला कमी करण्याचे काम करतात.
 
5 बाजरी - शरीरास ऊर्जा देण्यासह वजन कमी करण्यात उपयुक्त, भाकरी किंवा लाडू बनवून खावं किंवा खिचडी बनवून देखील खाऊ शकता.
 
6 साजूक तूप - व्हिटॅमिन A,D,E आणि K ने समृद्ध असलेल्या साजूक तुपात आढळणारे सीएलए,चयापचय संतुलित ठेवून फॅट्स वाढू देत नाही.
 
7 हंगामी फळ - वजन कमी करण्यासाठी आणि आपली प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवण्याचा दरम्यान सफरचंद, संत्री, नाशपती किंवा पपई सारखे हंगामी फळे खावे.
 
8 तीळ - व्हिटॅमिन इ ने समृद्ध असलेले तीळ चिक्की किंवा लाडू रूपात खाऊ शकता, काही जण याचे सेवन चटणीच्या रूपात देखील करतात.
 
9 भुईमूगाच्या शेंगा - व्हिटॅमिन बी, अमिनो ऍसिड आणि पॉलिफेनॉलने समृद्ध असलेल्या भुईमूगाच्या शेंगा खाल्ल्यानं बऱ्याच काळ भूक लागत नाही आणि आपण जास्त प्रमाणात कॅलरी खाण्यापासून वाचू शकता. 
 
10 हिरव्या पाले भाज्या-  आपल्या शरीरात चयापचय वाढविण्यासाठी आपल्या आहारात पालक, मेथी, मोहरीचे पाने, पुदिना, हिरवी पात सारख्या भाज्यांचा समावेश करावा.
 
11 लोणी - घरात बनवलेल्या लोणीत फॅट नसतं. पोळी किंवा पराठ्यावर थोडं लोणी लावून खावं. भाजी किंवा वरणात देखील लोणी घालून खाऊ शकता.