शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : शनिवार, 9 मे 2020 (09:44 IST)

राज्यात कोरोनाचे ३०९४ रुग्ण बरे होऊन घरी परतले

3470 patients
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ६३ झाली आहे. आज १०८९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १६९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३४७० रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख १२ हजार ३५० नमुन्यांपैकी १ लाख ९२ हजार १९७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह तर १९ हजार ६३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ३९ हजार ५३१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार ४९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
आज राज्यात ३७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ७३१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २५, पुण्यातील १०, जळगाव जिल्ह्यात १ तर अमरावती शहरात १ मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १९ पुरुष तर १८ महिला आहेत. आज झालेल्या ३७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण आहेत तर १६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहेत. ३७ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये (७३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.