गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 एप्रिल 2020 (22:05 IST)

राज्यात करोनाग्रस्तांची संख्या 490

महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून संख्या आता 490 वर पोहचली आहे. आज 67 नवे रुग्ण आढळले आहेत. 
 
गेल्या 24 तासात महाराष्ट्रातली रुग्णसंख्या 67 ने वाढली आहे. यापैकी 50 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 26 जणांचा मृत्यू झाला आहे. 12 हजार 858 नमुन्यांपैकी 11 हजार 968 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. 
 
सध्या राज्यात 38 हजार 398 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 3072 जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.