रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 7 एप्रिल 2020 (10:42 IST)

देशात गेल्या २४ तासात ७०४ नवे कोरोना रुग्ण

देशभरात कोरोनाबाधितांची संख्या ४५००च्या वर गेली आहे. गेल्या २४ तासात ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत त्यानंतर दिल्ली आणि तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होत आहे. देशात गेल्या २४ तासात ७०४ नवे रुग्ण आढळले आहेत.
 
कोरोनामुळे देशात आतापर्यंत १३६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात साठ वर्षाहून अधिक वय असलेल्या वृध्दांच्या मृत्यूचा आकडा ६३ टक्के इतका आहे.  देशातली कोरोनाबाधितांची संख्या पाहिली तर त्यात ४२ टक्के प्रमाण हे २१ ते ४० वर्षांच्या वयोगटाचं आहे. तर ४१ ते ६० वर्षांच्या व्यक्तींचं प्रमाण हे ३३ टक्के इतके आहे.