शनिवार, 3 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified गुरूवार, 22 जुलै 2021 (08:15 IST)

राज्यात 8,159 नवे रुग्ण, 7,839 जणांना डिस्चार्ज

महाराष्ट्रात बुधवारी 8 हजार 159 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर, 7 हजार 839 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 60 लाख 08 हजार 750 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 62 लाख 37 हजार 755 एवढी झाली आहे. महाराष्ट्रात सध्या 94 हजार 745 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्रात आज 165 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 30 हजार 918 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.09 टक्के एवढा झाला आहे. रिकव्हरी रेट 96.33 टक्क्यांवर पोहोचला आहे.
राज्यात आतापर्यंत 4 कोटी 60 लाख 68 हजार 435 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 51 हजार 521 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 3 हजार 795 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.