गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 24 मे 2021 (15:32 IST)

९५ वर्षांच्या आजीची कोरोनावर मात

95-year-old
अमरावती : कोविडबाधित झाल्यानंतर येथील जिल्हा कोविड रुग्णालयात उपचार घेऊन बरे होऊन ९५ वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनावर मात केली आहे.
 
मनकर्णाबाई कडू असे या आजींचे नाव असून त्या अचलपूर तालुक्यातील भुगाव येथील रहिवाशी आहेत. कोविडबाधित झाल्याने त्यांना १५ मे रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना आज घरी परतण्याची परवानगी देण्यात आली.
 
आजी घरी परतल्या असून आजींची प्रकृती चांगली आहे. उपचारादरम्यान त्यांनी संपूर्ण सहकार्य केले, अशी माहिती सुपर स्पेशालिटी स्थित जिल्हा कोविड रुग्णालयातील स्टाफने यावेळी दिली.
 
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. निलेश पाटील, डॉ. रवी भूषण यांच्यासह सर्व डॉक्टर अधिकारी व कर्मचारी यांनी आजींचे अभिनंदन केले.
 
योग्य उपचारांनी कोरोना पूर्णपणे बरा होतो. संसर्गापासून वाचण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्स व स्वच्छता यांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.