मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: बुधवार, 19 मे 2021 (19:23 IST)

आरोग्याच्या तक्रारी असल्यास आजीबाईंच्या बटव्यातील 7 घरगुती उपचार अवलंबवा

आरोग्याच्या अनेक लहान तक्रारी असतात. ज्यांच्या साठी लोक डॉक्टर कडे जात नाही, कारण ते घरगुती उपाय करून देखील बरे केले जाते.आज आम्ही सांगत आहोत आजीबाईंच्या बटव्यामधील असे काही 7 उपाय ज्यांना अवलंबवून आपल्याला आराम मिळेल. 
 
1 गॅसचा त्रास होत असल्यास लसणाच्या 2 पाकळ्या सोलून 2 चमचे साजूक तुपाने चावून चावून खावे. त्वरितच आराम मिळेल. 
 
2 कांद्याच्या रसात 2 लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने उलट्या होणं थांबते. 
 
3 वाळलेले तमालपत्र बारीक दळून प्रत्येक तिसऱ्या दिवशी एकदा ब्रश केल्याने दात चमकतील.
 
4 हीचकीचा त्रास होत असल्यास 1 -2 चमचे साजूक तूप गरम करून त्याचे सेवन करा. 
 
5 ताजी कोथिंबीर चोळून त्याचा वास घेतल्याने शिंका येणं बंद होतात. 
 
6 कांद्याचा रस मस्स्यांवर लावल्याने ते बारीक होऊन गळून पडतात. 
 
7 झोप न येण्याची तक्रार आहे तर रात्री झोपताना तळपायात मोहरीचे तेल लावा.