गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: रविवार, 16 मे 2021 (17:42 IST)

पोटात मुरडा येत असल्यास हे घरगुती उपचार अवलंबवा

पोटात मुरडा येत असल्यास तर आराम मिळविण्यासाठी काही उपाय सांगत आहोत ते अवलंबवावे.जेणे करून आपल्याला आराम मिळेल. 
खाण्या-पिण्यात काही वेगळे आले की ते आरोग्यासाठी नुकसान देते. याचा परिणाम पोटावर होतो. काही घरगुती उपाय करून आपण या वेदनेपासून आराम मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
* हिंगाचा वापर करा -
पाणी गरम करून त्यात हिंग आणि मीठ मिसळा. दिवसातून 2 वेळा हे पाणी प्यावे. या मुळे आराम मिळेल. 
 
* गरम पाणी प्या-
बद्धकोष्ठतेमुळे मुरडा येत आहे तर सकाळी उठल्यावर 1 ग्लास गरम पाण्यात लिंबू पिळून प्यावं.दिवसातून किमान 3 -4 वेळा गरम पाणी प्यावं. 
 
* ओवाचे सेवन करा-
रात्री झोपे पूर्वी ओवा भिजत घाला. सकाळी हे पाणी गाळून प्या. या मुळे पोटाच्या तक्रारी दूर होतील. 
 
* पुदिना घ्या-
पुदिना,कोथिंबीर,हिंग,काळ मीठ,जिरेपूड,लिंबाचा रस सर्व साहित्य एकत्र करून मिक्सर मध्ये वाटून घ्या. नंतर हे मिश्रण गाळून घ्या आणि प्यावे.
 
* पोटाला गरम पाण्याच्या शेक द्या-
एका काचेच्या बाटलीत किंवा गरम पाण्याच्या पिशवीत पाणी गरम करून भरून घ्या आणि पोटाला शेक द्या. 
 
* पोटात मुरड्यासह अतिसार चा त्रास होत असेल तर केळ खा. 
 
* पोट मुरडा येत असेल तर नारळ पाणी प्या.