तहान शमत नसल्यास हे घरगुती उपचार अवलंबवा
उन्हाळयात बाहेरच्या तापमानासह शरीरातील तापमान देखील जास्त असते. अशा परिस्थितीत शरीराला पाणी आणि इतर द्रव्य पदार्थांची आवश्यकता असते. जेणे करून तापमानात संतुलन राखता येईल. पुन्हा पुन्हा पाणी प्यायल्यावर देखील तहान शमत नसल्यास हे घरगुती उपचार अवलंबवा.
1 पाण्यात मध मिसळून गुळणे करा किंवा लवंग तोंडात ठेवा. असं केल्याने तहान शमते.
2 जायफळाचा तुकडा तोंडात ठेवल्याने देखील तहान शमते.
3 गायीच्या दुधाने बनलेले दही 125 ग्राम,साखर 60 ग्राम,साजूक तूप ग्राम,मध 3 ग्राम आणि काळीमिरपूड, वेलची पूड दोन्ही 5-5 ग्राम घ्या. दही फेणून त्यामध्ये हे सर्व जिन्नस मिसळा. एखाद्या स्टीलच्या भांड्यात ठेवा.त्यामधून थोडं थोडं दह्याचे सेवन केल्याने पुन्हा-पुन्हा लागणारी तहान शमते.
4 जवस आणि सातूचे पीठ पाण्यात घोळून त्यामध्ये थोडं तूप मिसळून पातळ प्यावे असं केल्याने तहान शमते.
5 तांदळाच्या पेच मध्ये मध घालून प्यायल्याने देखील तहान शमते.
6 पिंपळाची खोड जाळून पाण्यात घाला. त्या पाण्याला गाळून प्यावे असं केल्याने तहान शमेल.
7 विड्याचे पान खाल्ल्याने देखील तहान कमी होते.घसा कोरडा पडत नाही.
8 दह्यात गूळ मिसळून खाल्ल्याने जेवल्यावर लागणारी तहान कमी होते.
9 अननसाच्या मोरावळा खाल्ल्याने देखील शरीराची जळजळ थांबते ,हृदय देखील बळकट होत.
10 या व्यतिरिक्त कलिंगड खावे .या मुळे भूक भागते,तहान कमी होते. पोट देखील बऱ्याच काळ भरलेले असते.