स्नायू आणि शरीरात वेदना होत असल्यास हे घरगुती उपाय करा
सध्याच्या काळात प्रत्येकाला स्नायू आणि शरीरात वेदना होण्याचा त्रास असतो. या साठी काही घरगुती उपाय करून या त्रासापासून मुक्ती मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या.
* चेरीचे सेवन करा -चेरीमध्ये मुबलक प्रमाणात अँटी इम्प्लामेंटरी गुणधर्म आढळतात. हे स्नायूंची आणि शरीराची वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. दररोज चेरीचे सेवन केल्याने या वेदनेपासून आराम मिळतो.
2 गरम पाण्याच्या पिशवीने शेकून घ्या - स्नायूंचा ताण कमी करण्यासाठी गरम पिशवीने शेकून घ्या. या मुळे शरीरातील रक्तप्रवाह चांगल्या पद्धतीने काम करते. शेकून घेतल्याने शरीरातील वेदना कमी होते आणि त्वरितच आराम मिळतो.
3 आल्याचे सेवन करा- आल्याचे सेवन केल्याने अनेक त्रास दूर होतात. या मध्ये असलेले अँटीइंफ्लामेंटरी गुणधर्म रक्त प्रवाहाला सुरळीत करते. शरीराची आणि स्नायूंची वेदना कमी करते. या साठी आपण आल्याच्या चहा देखील घेऊ शकता.
4 व्हिटॅमिन्सयुक्त आहार घ्यावा- बऱ्याच वेळा शरीरात व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे देखील शरीरात वेदना उद्भवते.व्हिटॅमिन बी 1,व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे थकवा जाणवतो. म्हणून आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करावे ज्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स असावे. जेणे करून शरीरात आणि स्नायूंमध्ये वेदना होऊ नये.
5 मॉलिश करणे - शरीरातील वेदनेपासून मुक्ती मिळविण्यासाठी मॉलिश करणे सर्वात योग्य उपाय आहे आणि याचा वापर जास्त केला जातो. या मुळे तणाव कमी होतो आणि ऊतक देखील आरामदायी होतात. रक्त प्रवाह देखील सुरळीत होतो.वेदना कमी होते.