सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 29 एप्रिल 2021 (08:10 IST)

Vitamin D Deficiency: घरात राहून व्हिटॅमिन डीची कमतरता याप्रकारे करा दूर

व्हिटॅमिन डी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. हाडं, दात आणि स्नायू मजबूत राहावे यासाठी व्हिटॅमिन डी महत्त्वाची भूमिका बजावंत. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी अनेक लोक घरात बसून आहे. अशात व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवू शकते. आणि यामुळे अनेक शारीरिक त्रास देखील उद्भवू शकतात. यासाठी आवश्यक आहे की घरात राहून याची कमतरता कशा प्रकारे भरुन काढता येऊ शकते. त्यापूर्वी जाणून घ्या की याच्या कमतरतेमुळे कुठ-कुठले त्रास होऊ शकतात-
 
आपल्या शरीरातील 5 लक्षणं Vitamin D ची कमतरता दर्शवतात. आपल्याला हे लक्षणं दिसल्यास आपण लगेच यावर लक्ष देण्याची गरज आहे-
 
1 हाड आणि स्नायू कमकुवतपणा - जर आपल्याला हाडेदुखी आणि अशक्तपणासमवेत स्नायूंमध्ये सतत वेदना जाणवत असतील तर हे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे असू शकते. हाडे आणि स्नायूंसाठी व्हिटॅमिन डी ही एक अतिशय महत्वाचं पोषक तत्व आहे.
 
2 उच्च रक्तदाब - जर आपल्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर ते आपल्या रक्तदाबवर परिणाम करू शकते. त्याच्या कमतरतेमुळे बहुतेकदा उच्च रक्तदाब होतो.
 
3 ताण आणि उदास - विशेषत: महिलांमध्ये व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे तणावाची समस्या उद्भवते आणि यामुळे त्यांना सतत उदास असल्याचं जाणवतं. महिलांमध्ये व्हिटॅमिन डी जास्त आवश्यक आहे.
 
4 मूडवर प्रभाव - शरीरातील व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा थेट परिणाम आपल्या मूडवर होतो. त्याची कमतरता शरीरातील सेरोटोनिन हार्मोनच्या उत्पादनावर परिणाम करते जे आपल्या बदलत्या मूडला जबाबदार असू शकते.
 
5 आळशीपणा आणि थकवा - जर आपल्याला सतत थकल्यासारखे आणि सुस्तपणा जाणवत असाल तर शरीरातील व्हिटॅमिन डीची पातळी तपासा. व्हिटॅमिन डीची कमतरता देखील होऊ शकते. 
 
या गोष्टींद्वारे व्हिटॅमिन डीची कमतरता दूर होईल
सॅल्मन फिश हे ओमेगा 3 फॅटी अॅसिडने समृद्ध असते. ‍ही व्हिटॅमिन डीचा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे। जर आपण मांसाहारी असाल आणि मासे खात असाल तर साल्मन मासे खा. याने आपल्या शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता दूर होईल.
 
अंडं देखील व्हिटॅमिन डी चं उत्तम पर्याय आहे. अंड्याच्या योक अर्थात ‍पिवळ्या भागाचे सेवन केल्याने ही कमतरता दूर होऊ शकते.
 
संत्र्याचं रस व्हिटॅमिन सी सोबतच व्हिटॅमिन डीची कमतरता भरुन काढतं. आपण दररोज ऑरेज ज्यूसचे सेवन करुन समस्या सोडवू शकतात.
 
गायीचं दूध व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत आहे. हेल्थ एक्सपर्ट्सप्रमाणे लो फॅट मिल्क ऐवजी फुल क्रीम मिल्कचे सेवन करावे ज्यात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम आढळतं.
 
दह्याचे सेवन केल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता दूर होते. आपण याचे नियमित सेवन करु शकतात.