मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 3 डिसेंबर 2020 (10:16 IST)

आपल्या फुफ्फुसांना बळकट करण्यासाठी हे करा

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. लोक या पासून वाचण्यासाठी आपली प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी बरेचशे उपाय अवलंबवत आहे. सामाजिक अंतर राखून, वारंवार आपले हात धुऊन, मास्क वापरून आपण या पासून आपला बचाव करू शकतो. कोरोना व्हायरस मध्ये सर्वात जास्त त्रास अशा लोकांना होतो ज्यांना श्वासाचा त्रास आहे किंवा ज्यांचे फुफ्फुस कमकुवत आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या आजाराला मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांमध्ये त्यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे जे कोणत्या न कोणत्या आजाराने तसेच श्वासाच्या आजाराने झुंजतं होते किंवा ज्यांची फुफ्फुस कमकुवत होती. अशा परिस्थितीत आपण आपल्या फुफ्फुसांना बळकट करणं आवश्यक आहे आणि आपल्या खाण्यापिण्यात असं काही समाविष्ट करावे जेणे करून आपले फुफ्फुस बळकट करण्यास मदत मिळेल.    
 
1 अक्रोड -
अक्रोड मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड नावाचे ऍसिड आढळतं. जे श्वासाचा त्रास आणि दम्यासारख्या आजारांवर फायदा देतं. या साठी आपण आपल्या आहारात दर रोज 1 मूठ अक्रोड समावेश करावे.
 
2 सफरचंद - 
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जर आपल्याला निरोगी फुफ्फुसे हवे असतील तर आपल्या आहारात व्हिटॅमिन, सी, ई आणि बी आवर्जून समाविष्ट करावे. जे आपल्या फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यास मदत करतील. आपल्याला दररोज एक सफरचंद खाणे आवश्यक आहे.
 
3 आलं - 
आलं आपल्या फुफ्फुसांना डिटॉक्सीफाय म्हणजे स्वच्छ करतं, हे फुफ्फुसांना प्रदूषण मुक्त करतं. म्हणून कोरोना साथीच्या रोगात आपण आपल्या फुफ्फुसांना बळकट ठेवण्यासाठी आल्याचं सेवन करावं.
 
4 पाणी - 
पाणी आपल्या शरीराला डिटॉक्सीफाय करण्यासाठी मदत करतं. कोरड्या फुफ्फुसात जळजळ आणि सूज येण्याची दाट शक्यता असते. म्हणून शक्य असेल तितकं पाणी प्यावं. निरोगी फुफ्फुसांसाठी स्वतःला हायड्रेट ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. 
 
5 हळद - 
आपल्या घरात आढळणाऱ्या हळदीचे बरेच फायदे आहेत. या पैकी एक फुफ्फुसांना बळकट करणे आहे. हळद छाती दाटणे आणि दम्यासारख्या त्रासांपासून सुटका मिळवून देते. आपण दररोज दूध किंवा गरम पाण्या सह अर्धा चमचा हळद घेऊ शकता.

खाण्या-पिण्याच्या व्यतिरिक्त, श्वासोच्छ्वास करण्याचे व्यायाम करावे आणि शक्य तितक्या प्रदूषणाच्या संपर्कात येणं टाळावे. बाहेर किंवा वर्दळीच्या ठिकाणी जातांना नेहमीच मास्कचा वापर करावे.