शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 28 डिसेंबर 2020 (09:19 IST)

फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी 5 आरोग्यवर्धक पेय, दररोज सेवन करा

फुफ्फुसांना निरोगी ठेवणे किती महत्त्वाचे आहे हे सर्वांनाच माहित आहे. फुफ्फुस हे शरीराचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे जे मानवाला जिवंत आणि चांगले ठेवण्यात मदत करतात .अशा परिस्थितीत फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही उपाय करणे जास्त महत्त्वाचे आहे. फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी हे आरोग्यवर्धक पेय खूप प्रभावी आहे. तज्ज्ञ सांगतात की या आरोग्यवर्धक पेयाच्या व्यतिरिक्त, पुरेशी झोप, नियमितपणे केलेले व्यायाम फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.आपल्या शरीरातील सर्व पेशींना जिवंत आणि चांगल्या प्रकारे काम करत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे. फुफ्फुस ऑक्सिजन समृद्ध हवेमध्ये विनियमित असतात आणि शरीरातून कार्बन डाय ऑक्साइड सारखी घाण काढून टाकतात. सध्याच्या परिस्थितीत तर अन्न आणि वायू देखील शुद्ध नाही. असे बरेच आजार आहे की जे आपल्या आरोग्यासाठी धोका दायक आहे. 

बळकट फुफ्फुसांसाठी आरोग्यवर्धक आहार घेणं महत्त्वाचे आहे. सध्याच्या काळात मास्क लावण्या आणि झाडे लावण्या शिवाय काही उपाय करणं देखील आवश्यक आहे. हे 5 पेय फुफ्फुसांना प्रदूषणाविरुद्ध लढण्यासाठी बळकट बनवतात.
 
1 लिंबू, आलं आणि पिपरमिंट चहा -
लिंबू, आलं आणि पेपरमिंट चहाला सर्वात नैसर्गिक क्लींजर मध्ये एक मानतात. हे अँटी ऑक्सीडेन्ट सह मूत्रवर्धक म्हणून शरीराला डिटॉक्स करण्यात मदत करतो. चहामध्ये लिंबू टाकल्याने हे मेंदूला ताजेतवाने करतो. आलं नवीन ऊर्जा देतो आणि पुदिना हे घशाला आराम देतो. हे पेय अँटी ऑक्सीडेन्ट ने समृद्ध असतात जे फुफ्फुसांना बळकट करतात.
 
2 मध आणि गरम पाणी -
फुफ्फुसांना प्रदूषकांपासून लढण्यात मदत करण्यात मध आणि गरम पाणी पिणं प्रभावी आहे. याचे कारण असे की मधात अँटी इंफ्लिमेंट्री गुणधर्म असतात, जे सूज कमी करण्यासाठी प्रभावी आहे. गरम पाणी प्यायल्याने शरीराला डिटॉक्सीफाय करण्यासाठी खूप शक्तिशाली आहे. या मध्ये मधाचा गोडवा टाकल्यावर हे पेय फ्री रॅडिकल्स च्या हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी अधिक बळकट होतं. 
 
3 हळद-आलं पेय -
हळदीमध्ये कर्क्युमिन आहे, जे अँटी इंफ्लेमेट्री, अँटी ऑक्सीडेन्ट,अँटी कँसरस आहे आणि या मध्ये अँटी टॉक्सिसिटीचे गुणधर्म आढळतात. हे अवयवाला नुकसानापासून वाचविण्यासाठी शरीरातून हानिकारक विषारी पदार्थांना काढून टाकण्यात मदत करतात. या व्यतिरिक्त आलं मळमळ दूर करण्यात देखील  मदत करतो जे जास्त धुरामुळे होतं.
 
4 ग्रीन टी -
ग्रीन टी चे बरेच आरोग्यवर्धक फायदे आहे आणि हे फुफ्फुसांना स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर आहे. हे अँटी ऑक्सिडंटसह भरलेले आहे जे फुफ्फुसांची सूज कमी करण्यासाठी मदत करतो .दररोज आलं, लिंबू, मधासह एक कप ग्रीन टी प्यावी. ग्रीन टी फुफ्फुसांना स्वच्छ करण्यात मदत करते.
 
5 ज्येष्ठमधाचा चहा-
ज्येष्ठमधा चा चहा जरी लोकप्रिय नाही, तरी ही हे खोकला,शरीर आखडणे आणि तापाला कमी करण्यात प्रभावी मानले जाते. या डिटॉक्स पेयाचे सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका कमी करण्यात आणि फुफ्फुसे स्वच्छ करण्यात मदत मिळते.