घशात खवखव किंवा श्वसनाचा त्रास असल्यास गुळण्या करा, पण या 5 गोष्टींची काळजी नक्की घ्या
हवामान बदल्यानंतर घसा खवखवणे किंवा घसा बसणे अशी तक्रार येत असते. घसा खराब म्हणजे घशात दुखणे किंवा खाज येणं, घशात कफ साठणे आणि आवाज बदलणे.
घसा खराब असल्यास मिठाच्या पाण्याचे गुळण्या करणे फायद्याचं ठरतं. मिठाचे घोळ घशाच्या थरावर चढणाऱ्या बऱ्याच जंतांसाठी धोकादायक आहे. याचा प्रभावामुळे जंतांचा नायनाट होतो.
कफ साठलेला असल्यास हा घोळ गोठलेल्या कफाला पातळ करून घशाच्या बाहेर पडण्यास मदत करत, म्हणून मिठाच्या पाण्याचे गुळण्या करावयास सांगतात. पण गुळण्या करताना या गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.
1 सहन होईल तेवढेच गरम पाणी एका ग्लासात घेऊन त्यात एक चमचा मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या कराव्या.
2 तुरटीचा खडा देखील या पाण्यात टाकून गुळण्या केल्यास आराम मिळतो.
3 मिठासोबत 2 चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून गुळण्या केल्याने आराम मिळतो.
4 गरम पाण्यात मिठासोबत हळद वापरणे देखील फायदेशीर ठरतं. कारण याचे गुणधर्म एंटीबेक्टेरियल असतात.
5 पण हे लक्षात ठेवावं की तुरटी, सोडा किंवा हळद यापैकी मिठासोबत केवळ एकच वस्तू वापरावी.