स्वस्तिक नेहमी सरळ आणि सुंदर आखावे
कोणत्याही कामाच्या सुरुवातीस स्वस्तिक काढण्याची प्रथा आहे. हे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. स्वस्तिकाचे वास्तूमध्ये देखील महत्त्व सांगितले आहे. जाणून घ्या स्वस्तिकाशी निगडित काही खास गोष्टी.
* स्वस्तिक कधीही वेडे वाकडे बनवू नाही. हे नेहमी सरळ आणि सुंदर असावं.
* घरात कधीही उलट स्वस्तिक बनवू नये. विपरित स्वस्तिक एखाद्या वैशिष्टपूर्ण प्रयोजनासाठी देऊळात बनवतात. घरात नेहमी सरळ स्वस्तिकच आखावे.
* ज्या स्थळी स्वस्तिक काढायचं असेल ती जागा स्वच्छ आणि पवित्र असावी, तेथे घाण नसावी.
* पूजा करताना हळदीचे स्वस्तिक देखील बनवू शकतो. हळदीचे स्वस्तिक आखल्याने वैवाहिक जीवनाशी निगडित सर्व इच्छा पूर्ण होतात.
* इतर इच्छापूर्तींसाठी कुंकाने स्वस्तिक काढावे.