बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (12:33 IST)

उदबत्ती (अगरबत्ती)लावण्याचे 5 फायदे आणि 5 तोटे जाणून घ्या..

भारतात उदबत्ती लावण्याची प्रथा प्राचीनकाळापासूनच सुरू आहे. सुरुवातीस उदबत्तीच्या ऐवजी धुपकांडी लावायचे. भारताकडून ही प्रथा मध्य आशिया, तिबेट, चीन आणि जपानमध्ये गेली. चला तर मग जाणून घेऊ या उदबत्ती लावण्याचे 5 फायदे आणि 5 तोटे.
 
उदबत्ती लावण्याचे  5 फायदे -
 
1 उदबत्ती लावण्याचे 2 उद्दिष्टे आहे. पहिले हे की देवाच्या समोर उदबत्ती लावून त्यांना प्रसन्न करणे आणि दुसरे असे की घरात सुवास पसरवणे जेणे करून मनाला शांती मिळेल.
 
2 असे म्हणतात की उदबत्ती लावण्याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. विशिष्ट प्रकारच्या सुवासाने डोकेदुखी आणि मेंदूशी निगडित सर्व रोगांचा  नाश होतो.  
 
3 असे म्हणतात की उदबत्ती लावल्याने गृहकलह आणि पितृदोष असल्यास ते देखील नाहीसे होतात आणि घरात शांती आणि भरभराट राहते.
 
4 जर आपणांस कोणत्याही प्रकारची काळजी किंवा ताण असल्यास घरात विशिष्ट्य  प्रकारची सुवासिक उदबत्ती लावावी. या मुळे रात्री झोप देखील चांगली येते.
 
5 असे म्हणतात की उदबत्ती लावण्याने पारलौकिक किंवा दैवीय शक्ती आकर्षित होतात आणि त्यामुळे त्यांचा कडून व्यक्तीला मदत मिळते.
 
उदबत्ती लावण्याचे 5 तोटे -
 
1 संशोधकाच्या मतानुसार उदबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षाही जास्त धोकादायक असतो . हे आपल्या फुफ्फुसांना खराब करतं. मुलांसाठी तर हे हानिकारक असत. सुवासिक उदबत्ती घरात लावल्याने वायू प्रदूषण होतं विशेषतः कार्बन मोनोऑक्साइड.
 
2 संशोधकाच्या मते याचा धुरामुळे कर्करोग आणि मेंदूमध्ये गाठ (ट्यूमर)होण्यासारखे आजार उद्भवू शकतात. दक्षिण चीन तंत्रज्ञान विद्यापीठात(साऊथ चीन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी) संशोधन करण्यात आले. त्यामध्ये असलेले रसायन डीएनए मध्ये बदल करण्याबरोबरच शरीरात जळजळ आणि कर्करोगाच्या धोक्याला वाढवू शकतात. ब्रिटिश लंग्स फाउंडेशनचे वैधकीय सल्लागार डॉक्टर निक रॉबिन्सन म्हणाले की धूप कांडीच्या धुरासह अनेक प्रकारचे धूर ही विषारी असू शकतात. एक दुसऱ्या संशोधनानुसार उदबत्ती आणि धुपकांडीच्या धुरामध्ये अनेक प्रकारचे आढळणारे पॉलिएरोमॅटीक हायड्रोकार्बन(पीएएच) मुळे दमा, कर्करोग,डोकेदुखी आणि खोकला होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते.
 
वास्तविक, उदबत्तीला बनविण्यासाठी बरीच प्रकाराची तेल, रसायन, लाकूड, बनावटी अत्तर आणि इतर बऱ्याच वस्तू वापरल्या जातात. उदबत्तीमध्ये बेंझिन, ब्युटाडाइन आणि बेंझो पायरेन घटक जास्त प्रमाणात असतं. या रसायनांमुळे ल्युकेमिया आणि फुफ्फुस, त्वचा,आणि मूत्राशयाचे कर्करोग होऊ शकतात. 
 
3 भारतीय सनातन परंपरेत बांबू जाळण्यास मनाई आहे. असे म्हणतात की जर बांबूचे लाकडांनी चूल पेटवली तर वंशाचे नायनाट होण्यापासून कोणी ही रोखू शकणार नाही. उदबत्तीमध्ये बांबूचा वापर करण्यात येतो. तथापि काही लोकं असे मानतात की पुरातनकाळात बांबूच्या उपयुक्तेमुळे ते जाळण्यास मनाई केली गेली असावी.
 
4 तथापि शास्त्रज्ञाचा मतानुसार बांबू जाळल्याने आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. उदबत्ती बांबूच्या कांडीवर रासायनिक घटकांचे वापर करून बनविली जाते. या मध्ये बनावटी अत्तर मिसळतात. हे जाळल्याने बांबू देखील पेटतो आणि अत्तर देखील. बांबूमध्ये शिसे आणि भारी धातू आढळते. दोन्ही घटके जळल्याने हानिकारक घटक आपल्या श्वासेतून शरीरात पोहोचतात जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात.
 
अशी मान्यता आहे की बांबू जाळल्यावर भाग्य नाहीसे होतात. बांबू जरी भाग्यवर्धक आहे, परंतु ते जाळणे दुर्देवी असतं. फेंगशुई मध्ये दीर्घायुष्यासाठी बांबूचे झाड खूप सामर्थ्यशाली मानले आहेत. हे चांगले  भाग्य दर्शविणारे आहेत म्हणून आपण बांबूच्या झाडांचे चित्र लावून त्यांना सामर्थ्यवान बनवू शकता.
 
5 असे मानले जाते की बांबू जाळल्याने पितृदोष होतो. उदबत्ती बांबूने तयार करण्यात येते. म्हणून हे जाळणे शुभ नसतं. भगवान श्रीकृष्ण नेहमीच आपल्या सोबत बांबूची बासुरी ठेवायचे. भारतीय वस्तू विज्ञानात देखील बांबूला शुभ मानले गेले आहेत. लग्न मुंज, जावळ या शुभ कार्यात देखील बांबूची पूजा, बांबूचे मांडव बनविण्याच्या मागील देखील हेच कारण आहे. म्हणून बांबूला जाळणे शुभ मानत नाही. असे ही म्हणतात की जिथे बांबूचं रोपटं असतं तिथे वाईट शक्ती येत नाही.