1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : बुधवार, 15 मे 2024 (15:39 IST)

भारतात आला कोरोनाचा नवीन वेरिएंट, जाणून घ्या लक्षण

corona
कोरोनाचे नाव घेताच जुन्या आठवणी समोर येतात. कोरोना या भीषण महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले होते. अजून देखील कोरोनाने जगाला त्याच्या विळख्यात सोडले नाहीत तर आता या दरम्यान एक माहिती समोर आली आहे. भारतामध्ये मागच्या वर्षी 2023 मध्ये कोरोना व्हायरसचा एक नवीन वेरिएंट KP.2 लोकांच्या मध्ये आला आहे. या व्हायरसला FLiRT हे  नाव देण्यात आले आहे. कोरोनाच्या या नवीन वेरिएंटला अमेरिका, ब्रिटन, दक्षिण कोरिया मध्ये कोरोनाचे वाढत्या केस ला या नवीन वेरिएंट FLiRt शी जोडले जात आहे. 
 
कोरोनाचा हा नवीन वेरिएंट FLiRT ओमिक्रोन लाईनेजचा सब वेरिएंट आहे. मिळालेल्या माहितीनुसार KP.2 ला कोरोना वेरिएंट  JN.1 चा भाग मानला जातो. यामध्ये नवीन म्युटेशन आहे. तर याचे नाव FLiRT अक्षरांच्या आधारावर दिले गेले आहे. हा नवीन वेरिएंट  म्युटेशन व्हायरसला अँटीबॉडी वर अटक करायला मदत करतो. 
 
या नवीन व्हायरसपेक्षा जास्त प्रभाव भारतात JN.1 चा आहे. या वेरिएंटचे भारतात 679 केस ऍक्टिव्ह आहे. हे आकडे 14 मे पर्यंतचे आहे. कोरोनाचा हा नवीन FLiRT वेरिएंट घातक आहे कारण कोविड दरम्यान जो इम्युनिटी बूस्टर लावण्यात आला आहे. यावर त्याचा प्रभाव पडणार नाही. सध्यातरी सर्व डॉकटर यावर नजर ठेऊन आहे.  
 
या नवीन वेरिएंटला घेऊन अशोक युनिव्हर्सिटीमध्ये त्रिवेदी स्कुल ऑफ बायोसाइंजेसचे डीन डॉ. अनुराग अग्रवाल यांनी सांगितले की, असे म्युटेशन पहिले देखील पाहिले गेले आहे. घबरण्याची गोष्ट नाही. तसेच अमेरिका CDC चे म्हणणे आहे की, या नव्या वेरिएंट बद्दल अजून कोणतेही संकेत मिळाले नाही. ज्यामुळे माहिती पडेल की, KP.2 चे अन्य कोणतेही वेरिएंटच्या तुलनेमध्ये जास्त गंभीर आहेत.  
 
तर नवीन वेरिएंटच्या लक्षणांबद्दल अपोलो रुग्णालयाचे डॉकटर राजेश चावला म्हणाले की, या वेरिएंटने प्रभावित होणारे लोकांना चव लागत नाही, वास घेण्याची क्षमता कमी होते, खोकला, सर्दी, डोकेदुखी, थकवा, आणि थंडी वाजणे हे लक्षण दिसतात.