1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 मे 2024 (13:10 IST)

अल्पवयीन मुलीने लग्नास नकार दिल्याने, तरुणाने कापले मनगट

महाराष्ट्रात ठाण्यामध्ये एका अल्पवयीन मुलीने लग्नासाठी नकार दिल्याने 26 वर्षीय तरुणाने मनगट कापून घेतले. तसेच मुलीच्या कुटुंबावर हल्ला देखील केला. सुदैवाने यामध्ये कोणाला दुखापत झाली नाही. पोलिसांनी या आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. 
 
महाराष्ट्रामधील ठाण्यामध्ये एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या तरुणाने ज्या अल्पवयीन मुलीला मागणी घातली आहे ती फक्त 14 वर्षांची आहे. 
 
एका पोलीस अधिकारींनी सांगितले की, कल्याण पोलिसांनी एका 26 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. ज्याने 14 वर्षीय मुलीला लग्नाची मागणी घातली पण तिने नकार दिल्यामुळे तरुणाने डोक्यात राग ठेऊन मनगट कापून घेतले तसेच त्याने मुलीच्या कुटुंबावर हल्ला केला. या मुळे पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे.