1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : बुधवार, 15 मे 2024 (10:53 IST)

8 KG सोने, 14 कोटी कॅश आणि 72 तास, नांदेड मध्ये ITची मोठी कारवाई

income tax raid
महाराष्ट्रामधील नांदेडमध्ये आयकर विभागाने एक सोबत अनेक ठिकाणी मोठी कारवाई केली आहे. सतत 72 तास चालणाऱ्या आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये 8 KG सोने, 14 कोटी कॅश सोबत एकूण 170 कोटीची संपत्ती मिळाली आहे. जिला जप्त करण्यात आले आहे. अधिकारींना कॅश मोजायला कमीतकमी 14 तास लागलेत. 
 
महाराष्ट्रातील नांदेड मध्ये आयकर विभागाने भंडारी फायनांस व आदिनाथ कोऑपरेटिव बँक मध्ये धाड टाकली. या दरम्यान कोटींची बेकायदेशीर संपत्ती मिळाली आहे. जिला आयकर विभागाने जप्त केले आहे. कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात कॅश मिळाली. अधिकारींना कॅश मोजायला 14 तास लागलेत. 
 
आयकर विभागाने ही कारवाई सतत 72 तास सुरु ठेवली. यामध्ये विभागाला भंडारी फॅमिली जवळ 170 कोटीची बेकायदेशीर संपत्ती मिळाली. जिला जप्त करण्यात आले आहे. कमीतकमी 100 अधिकारींची टीम 25 गाड्या घेऊन नांदेड मध्ये पोहचली. व 72 तास सतत कारवाई केली गेली. 
 
नांदेड जिल्ह्यात पहिल्यांदाच आयकर विभागाने एवढी मोठी कारवाई केली आहे. आयकर विभागाने शुक्रवार, शनिवार, रविवार तीन दिवस सतत कारवाई सुरु ठेवली. सध्या आयकर विभाग या पूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे.