बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 15 मे 2024 (09:31 IST)

आंध्रप्रदेशमध्ये भीषण अपघात, 6 जणांचा जळून मृत्यू

accident on ganapati ghat
आंध्र प्रदेशमध्ये भीषण अपघात झाला असून त्यामध्ये 6 जणांचा जळून मृत्यू झाला आहे. तसेच 32 लोक गंभीर जखमी झाले आहे. बस आणि ट्रकची टक्कर झाल्यामुळे हा अपघात झाला आहे. ही टक्कर एवढी भीषण होती की, या मध्ये 6 लोक जाळल्यामुळे त्यांच्या मृत्यू झाला व 32 लोक गंभीररीत्या जखमी झाल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले आहे. 
 
हा अपघात बापटला जिल्ह्यातील हैद्राबाद-विजयवाडा हायवेवर बुधवारी झाला. बापटला वरून तेलंगणाची राजधानी हैद्राबाद येथे ही प्रवाशानी भरलेली बस जात होती. भरधाव ट्रक आणि बसची टक्कर झाली ही टक्के एवढी भीषण होती की, यामध्ये सहा लोक जिवंत जळालेत. तसेच 32 लोक गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जाळून मृत्यू झालेल्यांमध्ये एका 8 वर्षाच्या लहान मुलीचा देखील समावेश आहे. 
 
ही खाजगी बस बापटला जिल्यातील चिन्नागंजम मधून हैद्राबादला निघाली होती. पण हायवेवर ट्रकने टक्कर दिल्याने बसने पेट घेतला क्षणात बस चारही बाजूनी आगीच्या विळखायत सापडली. तसेच ट्रकने देखील पेट घेतला. तसेच या अपघातात ट्रक आणि बस ड्राइव्हर यांचा मृत्यू झाला आहे. तसेच चार लोकांचा देखील मृत्यू झाला आहे. 

Edited By- Dhanashri Naik